बुधवार, २५ जून, २०२५

टोकाची बुद्धिमत्ता असणारा वर्ग म्हणजे श्री मळाई शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी -- शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ श्री मळाई शिष्यवृत्ती २०२४-२५ परीक्षेचा निकाल जाहीर.

टोकाची बुद्धिमत्ता असणारा वर्ग म्हणजे श्री मळाई शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी -- शेतीमित्र मा.अशोकराव थोरात भाऊ
        श्री मळाई शिष्यवृत्ती २०२४-२५ परीक्षेचा निकाल जाहीर...
     मलकापूर -
        श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळाच्या वतीने इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने इयत्ता ४थी व ७ वी च्या स्तरावर घेण्यात येणाऱ्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ चा निकाल जाहीर करण्यात आला यावेळी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालक यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात शेतीमित्र मा. अशोकराव थोरात यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात संस्थेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या गुणवत्ता वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थी घडविण्यामागे शाळा,शाळेतील शिक्षक, आपल्या पाल्यांना संस्कारक्षम बनवण्यासाठी धडपडणारे पालक यांच्यामुळेच शाळा व संस्थेचे नाव उज्ज्वल होत आहे. सामान्य कुटुंबातील मुले,मुली उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी पात्र होत आहे हे डॉ.स्वाती थोरात यांनी ५ वर्षापूर्वी सुरु केलेल्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेचे यश आहे. तसेच ज्यांना क्रीम लेवल म्हणजे टोकाची बुद्धिमत्ता असणारे श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, पालक त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा चांगला संयोग कार्यक्रमाच्या निमित्ताने आज घडून आला असून स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करून त्यांना धारक होण्यासाठी उत्तम प्रशिक्षण देणारा शिक्षक वर्ग हे सर्व आज यां कौतुकास पात्र आहेत.
           यावेळी संस्थेचे सचिव शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ,प्रमुख पाहुणे शिवशंकर ज्वेलर्स कराडचे अविनाश जगताप,मा. प्रियांका जगताप.मलकापूर केंद्राचे केंद्रप्रमुख मा.गणेश जाधव, सौ.शालिनीताई थोरात ( काकी ) संचालक वसंतराव चव्हाण,पथक पर्यवेक्षण प्रमुख आर. ए. कुंभार सर, मा. चंद्रकांत कुंभार, चव्हाण सर, मोहिते सर, नीट परीक्षा पात्र विद्यार्थिनी सिद्दिका मुर्सल,मा. गणेश पवार,,दैनिक पुण्यनगरीचे मा. अतुल काकडे, हितचिंतक पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
      यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे यांनी केले.त्यांनी संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात याच्या मार्गदर्शनानुसार सुरु झालेले श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळ व त्याचे कामकाज, परीक्षा घेण्यामागचा हेतू याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
         कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. प्रियांका जगताप शिवशंकर ज्वेलर्स कराड यांनी यावेळी संस्थेच्या उपक्रमांना शुभेच्छा देत श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेतील धारक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे कौतुक केले. विद्यार्थ्याचे अथक परिश्रम, पालक सहकार्य व त्या सर्वांना मिळणारे संस्थेचे आर्थिक आणि बौद्धिक पाठबळ या सर्वांच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले, तसेच गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे खरे सोने असून त्याला झळाळी देण्याची काम श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या वतीने होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तसेच श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा ही शिष्यवृत्तीचा पथदर्शी उपक्रम आहे
 असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. भगवानराव पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत संस्थेच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था व संस्थेच्या सर्व शाखेतील शिक्षक वृंद नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळे आज आपण ज्यांच्या सत्कारासाठी उपस्थित आहोत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संस्थेच्या इतिहासातील दखलपात्र घटक आहेत तसेच त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
             यावेळी केंद्रप्रमुख मलकापूर मा.गणेश जाधव, नीट परीक्षा धारक विद्यार्थिनी सिद्धीका मुर्सल, मा. चंद्रकांत कुंभार, प्राचार्या सौ. अरुणा कुंभार यांचीही भाषणे झाली व त्यांनी आपल्या मनोगतातून सर्व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे कौतुक केले व संस्थेचे उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
       
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सविता कोळी व सौ.कविता थोरात यांनी तर आभार सौ. करुणा शिर्के यांनी मानले.
      श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ चा निकाल पुढीलप्रमाणे----
   इयत्ता ७वी (मराठी माध्यम )
कु.आर्या पवार- प्रथम क्रमांक -कन्या शाळा मलकापूर 
चि. वरदराज शिंदे -द्वितीय- आनंदराव विद्यालय पोतले.
कु.जान्हवी संदीप मोरे तृतीय -आ. च विद्यालय मलकापूर.
कु. संस्कृती धनंजय गरुड उत्तेजनार्थ आ.च.विद्यालय पोतले.
कु.वेदिका विनोद गरुड उत्तेजनार्थ आ. च. विद्यालय पोतले 
कु. स्वस्ती दादासो देशमुख उत्तेजनार्थ कन्याशाळा मलकापूर

 ४थी (मराठी माध्यम )
चि.अंशुल सुरेश शिंदे-- प्रथम- आदर्श प्राथमिक आगाशिवनगर 
चि.मंथन मयूर गरुड -द्वितीय- आदर्श प्राथमिक आगाशिवनगर
कु. त्रिशा संदीप शिर्के तृतीय आदर्श प्राथमिक मलकापूर 
चि.विराज किशोर पाटील उत्तेजनार्थ आदर्श प्राथमिक आगाशिवनगर
चि. श्रेयस सचिन चव्हाण उत्तेजनार्थ आदर्श प्राथमिक आगाशिवनगर..

 इयत्ता ७वी ( इंग्रजी माध्यम)
कु. सबा समीर डांगे प्रथम --स्टार इंग्लिश मीडियम अँड जुनिअर कॉलेज मलकापूर
चि. धैर्यशील प्रभाकर शिंदे द्वितीय-- स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज मलकापूर.
चि. समर्थ सुरेंद्र गुरव उत्तेजनार्थ -स्टार इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर.
 इयत्ता ४थी (इंग्रजी माध्यम )
कु.अनुश्री आनंदा साळुंखे प्रथम-- स्टार इंग्लिश मीडियम अँड ज्युनियर कॉलेज मलकापूर 
विश्वराज गणेश पवार -प्रथम- स्टार इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर 
कु.आराध्या सुनील वाळके उत्तेजनार्थ स्टार इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज मलकापूर.
       
     यावेळी मागील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मधील एक हजार रुपयाच्या धनादेशाचे वितरण ही मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मंगळवार, १० जून, २०२५

वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण 2025

यशवंत हायस्कूल कराड या ठिकाणी वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण 2 जून ते 12 जून 2025 या दरम्यान संपन्न झाली सदर प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून माननीय श्री विजय भिसे सर हे होते त्याचबरोबर सुलभक म्हणून सौ शेडगे मॅडम,  श्री खैरमोडे सर,  श्री शिवदास सर यांनी मार्गदर्शन केले.

आता परत चौथी व सातवीच्या वर्गाला शिष्यवृत्ती परीक्षा होणार.... वाचा सविस्तर 👇👇

Scholarship Exam 2025 Changes: परीक्षा वेळापत्रक आणि आयोजन (Revised Exam Schedule & Implementation) 🕒 २०२५-२६ मध्ये विशेष बाब: इ.५ वी व...