५५वा महिला मेळावा मलकापूर येथे महिलांच्या उस्फुर्त सहभागाने संपन्न.
मलकापूर मध्ये अवतरल्या गौराई..
मलकापूर-
श्री मळाईदेवी शिक्षण संस्था,श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्था जखिणवाडी व श्री मळाई महिला विकास मंच मलकापूर यांचे संयुक्त विदयमाने मलकापूर, आगाशिवनगर पंचक्रोशीतील महिलांसाठी घेण्यात आलेला महिला मेळावा शनिवार दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात व महिलांच्या उस्फुर्त सहभागाने पार पडला. प्रमुख पाहुण्या हेल्दी मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख योगशिक्षिका मा. सौ. स्मिता हिम्मत वेल्हाळ, कार्यक्रमाच्या अध्यक्षा उपनिबंधक सहकारी संस्था कराडच्या मा. श्रीमती अपर्णा यादव, मा. सौ.शालिनीताई थोरात (काकी), श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माजी व्हाइस चेअरमन मा. सौ. अरुणादेवी पाटील श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्याक्षा डॉ. सौ. स्वाती रणजीत थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाच्या पाहुण्या मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
प्रास्ताविकपर भाषणात श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. सौ. स्वाती थोरात यांनी महिला मेळावा घेण्यामागचा उद्देश स्पष्ट करीत मळाई महिला विकास मंच नेहमीच महिला मेळाव्याचे आयोजन करून महिलाच्या कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारच तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले.सुखाचे सण म्हणजेच मंगळागौर होय. या संस्कृतीचे आपणांस जतन करायचे आहे. यावेळी पिंगळ्याच्या गाण्यातून विरोधाभास वाटत असला तरी त्यामधून नात्यांची जपणूक कशी करावी हे सांगितले आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी हेल्दी मंगळागौर ग्रुप कराडच्या प्रमुख मा. सौ. स्मिता वेल्हाळ यांचे मार्गदर्शनाखाली मंगळागौर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधील शिक्षिका महिला पालक यांनी वेगवेगळे गीतांवर उत्कृष्ट नृत्य सादर करून कार्यक्रमांमध्ये बहार आणली. यामध्ये गणेश वंदनापासून ते गौरी गणपतीच्या विविध गाण्यांवर नृत्य सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी मळा ई महिला विकास मंचच्या वतीने सहभागी महिलांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले.
या महिला मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व शाळेतील शिक्षिका, महिला पालक वर्ग यांनी मोठ्या संख्येने भाग घेऊन या महिला मिळवणारे खऱ्या अर्थाने कोणत्याही क्षेत्रात कमी नसतात हे या निमित्ताने अधोरेखित केले. तसेच महिलांच्या कर्तृत्वाला कोणतेही प्रकारचे सीमा नसते यांचे उत्तम उदाहरण म्हणजे घराला घरपण देणारी महिला अर्थात गृहिणी ते आपले आवडते छंद तितक्याच ताकदीने जोपसणारी कलारसिक, कलाउपासक असा तिचा कल असेच काही चित्र या महिला मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.शीला पाटील, प्रा. सौ. सुरेखा खंडागळे यांनी केले तर आभार माजी व्हाईस चेअरमन मा.सौ अरुणादेवी पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री मळाई महिला विकास मंचच्या सर्व सदस्या, सर्व शिक्षिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या विकासासाठी व त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी श्री
मळाई महिला विकास मंचने आयोजित केलेल्या या महिला मेळाव्याचे महिला पालक वर्गामध्ये विशेष कौतुक होत आहे..