सोमवार, २ मार्च, २०२६

आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर येथे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर येथे 'कचऱ्याची होळी'; स्वच्छतेचा संदेश देत सण उत्साहात साजरा..
कराड (प्रतिनिधी):
येथील आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर येथे होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला. परंपरेला आधुनिकतेची जोड देत, विद्यार्थ्यांनी परिसरात गोळा केलेल्या कचऱ्याची होळी करून स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला.
या स्तुत्य उपक्रमाचे व मुलांच्या कल्पकतेचे संस्थेचे सचिव मा. श्री. अशोकराव थोरात (भाऊ) तसेच संस्थेच्या सर्व संचालकांनी विशेष कौतुक केले आहे. विद्यालयाने राबवलेला हा उपक्रम पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेच्या प्रांगणात आयोजित या होळीचे पूजन मुख्याध्यापक श्री. सचिन शिंदे सर यांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नेटकेपणाने करण्यात आले होते.
याप्रसंगी सौ. अश्विनी पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना होळी सणाचे महत्त्व आणि त्यामागची पौराणिक कथा सांगितली. तसेच, सौ. प्राजक्ता पाटील यांनी या विशेष होळीची पूर्वतयारी आणि मांडणी अतिशय कल्पकतेने केली होती.
मुलांनी स्वतःहून कचरा गोळा करून त्याचे दहन केल्यामुळे 'स्वच्छ भारत' अभियानाला शाळेने आपला खारीचा वाटा उचलला आहे. शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे पालकांमधून आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
       
             श्री रफिक सुतार सर 
आदर्श प्राथमिक विद्यालय आगाशिवनगर 

1 टिप्पणी:

मलकापुरात रंगला "५७ वा महिला मेळावा "नारीशक्तीचा जागर आणि 'होम मिनिस्टरचा थरार '... मलकापूरच्या ज्योती देशमुख ठरल्या मानाच्या पैठणीच्या मानकरी..

मलकापुरात रंगला "५७ वा महिला मेळावा "नारीशक्तीचा जागर आणि 'होम मिनिस्टरचा थरार '...      मलकापूरच्...